ताजी बातमी ऑनलाईन टीम
देशभरात दिवसेंदिवस महागाईचा भडका उडत आहे. त्यामध्ये तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल, त्याचबरोबर गॅसच्या किमती वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर व्यावसायिक गॅस सिलेंडर दरांसही आता तेल कंपन्यांनी विमानाच्या इंधन दरात (एटीएफ) 3.22 टक्क्यांनी वाढ केली आहे. चालू वर्षात एटीएफ दरात झालेली ही सलग नववी वाढ आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएफ दरात प्रती किलोलीटरमागे 3649.13 रुपयांची वाढ झाली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत हे दर 1 लाख 16 हजार 851 रुपयांवर गेले आहेत. मागील काही दिवसांपासून इंधन दरामध्ये सातत्याने वाढ होत आहेत. तर आता मे महिन्याची सुरुवातच गॅस सिलेंडर दरातील वाढीने झालेली असून सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडर दरात 102.50 रुपयांनी वाढ केली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन दरवाढीनंतर 19 किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर 2253 रुपयांवरून 2355.50 रुपयांवर गेले आहेत. तर दुसरीकडे 5 किलो वजनाच्या गॅस सिलेंडरचे दर 655 रुपयांवर गेले आहेत. या आधी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला देखील गॅस सिलेंडर दरात 250 रुपयांची तर मार्चच्या सुरुवातीला 105 रुपयांची वाढ झाली होती. शिवाय 9 मार्च रोजी हे दर 9 रुपयांनी वाढविण्यात आले होते.