तासगाव सांगली रस्त्यावर कवठेएकंद गावाजवळ चार चाकी आणि मोटरसायकलचा अपघात झाला. या अपघातातील जखमी बिरु बापू दुधाळ (रा, कवठेएकंद ) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी अंकुश बापू दुधाळ यांनी तासगाव पोलिसात फिर्याद दाखल केली असून अपघात प्रकरणी अंकुश रानबा पंडित ( रा,पचशीलनगर ,खानापूर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, मयत बिरु दुधाळ हे मोटरसायकल ( एम एच १० सि डी ६९९५) वरून कवठेएकंद गावाकडे निघाले होते. तर अंकुश पंडित हे चार चाकी ( एम एच १४ बी आर २४७) ने तासगावकडे येत असताना दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात मोटरसायकलस्वाएर दुधाळ गंभीर जखमी झाले. त्या स तात्काीळ सांगली येथील खाजगी रुगालायात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्याान त्यां्चा मृत्यू झाला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत.