राज्यातील दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेले हजारो विद्यार्थी आपल्या निकालाची वाट पाहत आहे. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळने सांगितले की दाहावी आणि बारावीचे निकाल जूनमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्यात एसएससी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती आणि तर एचएससी परीक्षा राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 या कालावधीत घेण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी TOI शी बोलताना म्हणाले की “शिक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका तपासणे पूर्ण केले आहे आणि उत्तरपत्रिका बारकोडचे परीक्षण आणि स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. राज्यातील दाहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल अनुक्रमे 10 जून आणि 20 जून पर्यंत घोषित केले जातील”. विशेष म्हणजे खासगी विनाअनुदानित शाळांच्या काही शिक्षकांनी मूल्यांकनाच्या कामात भाग घेण्यास नकार दिल्याने निकाल जाहीर होण्यास विलंब होण्याची भीती असताना मंडळाचे हे विधान आले आहे.
दरम्यान दहावी बारावी पराक्षांच्या निकालांसंदर्भात अनेक शक्यता वर्तवण्यात येत होत्या. सर्व अटकळांना पूर्णविराम देत गोसावी म्हणाले की “मंडळाकडून कोणताही विलंब होणार नाही. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणपत्रिका निर्धारित वेळेत मिळतील. अधिक माहिती देताना गोसावी म्हणाले “जवळपास 70 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित 30 टक्यामध्ये बार कोड स्कॅनिंगचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आम्ही बारावी आणि दहावी परीक्षांच्या निकालांसाठी 10 आणि 20 जून या तारखा निश्चित केल्या आहेत”
बारावीच्या परीक्षेला यंदा 14.72 लाखांहून अधिक विद्यार्थ्यी बसले होते. तर 16.25 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. महाराष्ट्र एसएसी आणि एचएससीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी त्यांचा स्कोअर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जाऊन तपासून आणि डाऊनलोड करू शकतील.
असा तपासा निकाल
• महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट द्या.
• महाराष्ट्र एसएससी (Class10th) किंवा महाराष्ट्र एचएससी (Class 12th) निकाल 2022 वर क्लिक करा.
• तुमची लॉगिन क्रेडेंशियल जसे की रोल नंबर/नोंदणी क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल एंटर करा आणि submit वर क्लिक करा
• तुमचा महाराष्ट्र बोर्ड 2022 चा निकाल स्क्रीनवर दिसेल. भविष्यातील संदर्भासाठी तो सेव्ह करा.
अधिकृत वेबसाइटची यादी
mahahsscboard.in
msbshse.co.in
mh-ssc.ac.in
mahresult.nic.in