Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगपीएम किसान योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य; ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा...

पीएम किसान योजनेसाठी ई केवायसी अनिवार्य; ‘या’ तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 11 वा हप्ता

तुम्ही पंतप्रधान किसान योजनेमध्ये नोंदणी केली असेल आणि 11व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 11व्या हप्त्याचे 2000 रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. पी एम किसान योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना आता सरकारने ई केवायसी अनिवार्य केले आहे. अजुन पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 11 वा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा झालेला नाही.
पीएम किसान योजना 11 वा हप्ता कधी जमा होणार याची अनेक शेतकरी वाट पाहत आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत याबाबत केंद्र सरकारकडून माहिती दिली जाऊ शकते. मे महिना अखेर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 11 व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी त्यांचे eKYC पूर्ण करणे अनिवार्य केले आहे. ई केवायसी करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम मुदत होती. परंतु सरकारने आता हीच मुदत 31 मे पर्यंत वाढविली आहे. आपण घरबसल्या मोबाईल अॅप किंवा संगणकाच्या साहाय्याने eKYC अर्ज भरू शकतो. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून https://pmkisan.gov.in/ आपण ही प्रक्रिया पूर्ण करू शकतो.
पैसे न मिळाल्यास खाली दिलेल्या क्रमांकांवर तक्रार करा :-

पीएम किसान टोल फ्री क्रमांक : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन क्रमांक : 155261

पीएम किसान लँडलाइन क्रमांक : 011-23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन : 0120-6025109
ई-मेल आयडी : pmkisan-ict@gov.in

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -