Sunday, July 27, 2025
Homeमहाराष्ट्रकिडनी रॅकेट प्रकरण, 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल!

किडनी रॅकेट प्रकरण, 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल!

पुण्यातील किडनी तस्करी प्रकरण उघडकिस आल्यापासून याप्रकरणावर जोरदार चर्चा सुरु आहे. या किडनी तस्करी प्रकरणामध्ये पुण्याचे नामांकित हॉस्पिटल रुबी हॉल क्लिनिकचे नाव समोर आले आहे. या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख परवेझ ग्रांट यांच्यासह हॉस्पिटलमधील 15 डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

किडनी तस्करी प्रकरणी एका महिलेने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन पोलिसांनी रूबी हॉलचे डॉक्टर ग्रँड परवेज यांच्यासह 15 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कागदपत्रांची खात्री न करता दिशाभूल करुन किडनी बदलल्याचा आरोप तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. कोल्हापूरच्या एका महिलेला 15 लाख रुपयांचे आमिष दाखवून तिची किडनी काढण्यात आली होती. याप्रकरणावरुनच पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, ज्या महिलेची किडनी काढण्यात आली ती महिला सुद्धा बनावट कागदपत्रं तयार करून यात सहभागी असल्याचे आढळून आल्याने तिच्यावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सारिका सुतार असे या महिलेचे नाव आहे. सारिका सुतार यांनी फसवणूक करून किडनी काढल्याचा आरोप केला होता. सारिका सुतार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली. या चौकशीत पोलिसांना सारिका सुतार या महिलेची 15 लाख रुपयांच्या बदल्यात किडनी काढून दुसऱ्या व्यक्तीला बसवण्याचे ठरले होते असे आढळले.

सारिका सुतार यांची बनावट नावाने कागदपत्रे तयार करण्यात आली. मात्र सारिका सुतार यांना ठरल्याप्रमाणे 15 लाख देण्यास नकार देण्यात आला. या महिलेला फक्त चार लाख रुपये देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर या महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे चौकशीत दिसून आले. या प्रकरणात रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टरही सहभागी असल्याचे पोलिसांनी चौकशीत आढळून आले त्यानंतर त्यांनी याप्रकरणी 15 डॉक्टरांसोबत या महिलेविरोदात देखील गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, आरोग्य विभागाने याआधी रूबी हॉल क्लिनिकच्या प्रत्यारोपणाचा परवाना रद्द केला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -