भारतीय टेलिकाॅम क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे अर्थातच ‘रिलायन्स जिओ’.. ‘जिओ’ने आतापर्यंत आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त नि मस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. त्याला ग्राहकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.. त्यामुळे भारतीय टेलिकाॅम क्षेत्रात ‘जिओ’ने आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे..
खरं तर गेल्या काही दिवसांत भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल झालेत. सुरुवातीला 4 रुपयांत येणारा छोटा रिचार्ज आता इतिहासजमा झालाय. आता टेलिकाॅम कंपन्या 10 रुपयांचा रिचार्ज ऑफर करतात, परंतु 10 रुपयांत काय मिळतं, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर थांबा..!
आपल्या युजर्ससाठी ‘जिओ’ने (Jio) फक्त 10 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सादर केला असून, त्यात तुम्हाला बऱ्याच काही सुविधा मिळत आहेत.. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
‘जिओ’च्या छोट्या प्लॅनबाबत..
2016 च्या आसपास ‘टॉक टाइम’ हा शब्द खूपच प्रचलित झाला होता. आतासारखं त्यावेळी ‘अनलिमिटेड कॉलिंग’ नि ‘फ्रि डेटा’ अशा सुविधा युजर्सना मिळत नव्हत्या, तर ‘टॉक टाइम’ खर्च करुन मोबाईलवर बोलावं लागत होतं. मात्र, टेलिकॉम कंपन्या आजही ‘टाॅक टाईम’ची सुविधा ऑफर करतात.
‘रिलायन्स जिओ’नं तर फक्त 10 रुपयांचा रिचार्ज प्लॅन आणला आहे. त्यात युजर्सला 7.47 रुपयांचा ‘टॉक टाइम’ मिळतो. त्याच्या मदतीने तुम्ही डेटा, कॉलिंग नि ‘एसएमएस’ या तीन सेवा वापरू शकता.
‘जिओ’ आपल्या 10 रुपयाच्या प्लॅनसह 20 रुपये, 50 रुपये आणि 100 रुपयांचाही टॉप-अप ऑफर करते. ‘जिओ’च्या 20 रुपयांच्या रिचार्जमध्ये 14.95 रुपये, 50 रुपयांत 39.37 रुपये, तर 100 रुपयांमध्ये 81.75 रुपयांचा ‘टॉक टाइम’ मिळतो. त्याचा वापर तुम्ही इंटरनॅशनल सर्विसेससाठीही करू शकता.
विशेष म्हणजे, जिओ कंपनी अगदी 500 नि 1000 रुपयांचाही ‘टॉप-अप’ ऑफर करते. मात्र, हे ‘टॉप-अप’ रिचार्ज तुम्ही कोणत्याही वॅलिडिटी प्लॅनप्रमाणे वापरु शकत नाहीत, तर त्यासाठी वेगळे नियम असल्याचे दिसते.. मात्र, छोट्या कामांसाठी तुम्हाला असे छोटे रिचार्जही फायदेशीर ठरु शकतात..