आजपर्यंत अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला. अभिनय आणि झगमगत्या विश्वाला राम-राम ठोकत त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. आता देखील एका बोल्ड अभिनेत्रीने आपला मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. अभिनेत्री कंगना शर्माने ‘आप’ म्हणजेच आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. सध्या तिचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
कंगना शर्मा राजकारणात सक्रिय
झगमगत्या विश्वात बोल्ड रूप दाखवल्यानंतर कंगना शर्मा आता राजकारणाच्या वाटेवर आली आहे. कंगनाने आता ‘आप’ पक्षात प्रवेश करून आपली राजकीय खेळी सुरू केली आहे. याबाबत आप पक्षाने ट्विटही केले आहे.
ट्विट करत म्हणले, ‘प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका कंगना शर्मा खेमका हिने अरविंद केजरीवाल यांच्या धोरणांमुळे प्रभावित होऊन आम आदमी पक्षात प्रवेश केला. ‘आप’ कुटुंब तिचं स्वागत करत आहे.’
कंगना शर्मा ही हरियाणवी अभिनेत्री आहे. अभिनयापूर्वी ती मॉडेलिंग करायची आणि त्यानंतर तिने सिनेमांमध्येही नशीब आजमावलं. कंगनाने ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ सिनेमातून पदार्पण केलं, पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा फारसा कमाल दाखवू शकला नाही.