Monday, July 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : सराफ व्यावसायिकाची ५७ लाखांची फसवणूक

कोल्हापूर : सराफ व्यावसायिकाची ५७ लाखांची फसवणूक

सोन्याचे मणी बनविणाऱ्या सराफी व्यावसायिकाची ५७ लाख ५६ हजार ७१८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कारागीर प्रशांत दत्तात्रय गजगेश्वर (रा. जोशी गल्ली) याच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिसांत मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

शाहू ऊर्फ संजय हिंदुराव जाधव (रा. मंगळवार पेठ) यांचा सोन्याचे मणी तयार करून देण्याचा व्यवसाय आहे. तर संशयित गजगेश्वर हा १८ वर्षांपासून त्यांच्याकडून चोख सोने घेऊन सोन्याचे मनी बनवून देण्याचे काम करीत आहे. गजगेश्वरने जाधव यांचा विश्वास संपादन करून सोन्याचे मणी बनवून देतो, असे सांगून एकूण ५७ लाख ५६ हजार ७१८ रुपये किमतीचे चोख सोने घेऊन गेला. मात्र, चोख सोने व पाष्टा काढलेले सोने परत न करता त्याने अपहार केल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. ही घटना नोव्हेंबर २०२१ ते २४ डिसेंबर २०२१ या काळात घडली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -