Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानसरसकट वापरले जाणारे ‘हे’ 3 अॅप ठरले धोकादायक; तातडीने करा डिलीट

सरसकट वापरले जाणारे ‘हे’ 3 अॅप ठरले धोकादायक; तातडीने करा डिलीट

मोबाईल, तंत्रज्ञान आणि डिजिटल गोष्टींमुळे सगळे काही सोपे झाले आहे. अगदी पैशाचे व्यवहारही आपण मोबाईलमधूनच करतो. मोबाईलशिवाय आपण जगू शकतो, हे लोकांना विस्मरणात गेले आहे. मात्र डिजिटल वापर जसा वाढला तसे digital fraud सुद्धा वाढले. आपल्या वैयक्तिक माहितीचा गैरवापर तर अतिशय मोठ्या प्रमाणात वाढला. आणि त्याचाच फटका आपल्याला नकळत बसू लागला. गुगल सातत्याने धोकादायक अॅप शोधत त्यावर कारवाई करत असते. आणि लोकांना असे अॅप वापरू नका म्हणून सूचित करत असते.

 

आजकाल सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये आढळणाऱ्या 3 अॅपला गुगलने धोकादायक जाहीर केले आहे. हे तीनही फार विचित्र प्रकारे आपली फसवणूक करतात. जेव्हा आपण हे अॅप इन्स्टॉल करतो. कोणतेही अॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करीत असताना सगळ्यात आधी युजर्सची वैयक्तिक माहिती पाहण्याविषयी परवानगी मागितली जाते. अगदी याच प्रकारे हे 3 अॅप पण परवानगी मागतात. त्यानंतर काही दिवसांनी मालवेअर म्हणून काम करतात.

हे मालवेअर तुमच्या मशीन किंवा डिव्हाईसवरुन लॉगिन क्रेडिन्शियल्स चोरतात. धोकादायक मालवेअर इन्स्टॉल केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बँकिंग फसवणूक होत असल्याचं दिसून आलं आहे. हे मालवेअर युजर्सच्या परवानगीशिवाय अँड्रॉइड यूजर्सचे पैसे चोरतात.

 

जाणून घ्या कोणते आहेत हे 3 अॅप :-

  • स्टाईल मेसेज (Style Message)
  • ब्लड प्रेशर अॅप (Blood Pressure App)
  • कॅमेरा PDF स्कॅनर (Camera PDF scanner

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका अभ्यासात असे समोर आले होते की, एकूण अॅपपैकी 70 टक्के अॅप वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती थर्ड पार्टी कंपन्यांना देतात. या थर्ड पार्टी कंपन्यांमध्ये गुगल आणि फेसबुकसारख्या कंपन्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -