Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर ; १७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

कोल्हापूर ; १७ वर्षीय रमेशबाबू प्रज्ञानंदने केले जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनला पराभूत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जगातल्या अव्वल मानांकित बुद्धिबळपटू सोबत खेळायला मिळणे आणि त्याला हरवणे हे प्रत्येक बुद्धिबळपटू चे स्वप्न असते. रमेशबाबू प्रज्ञानंद याने हा चमत्कार केला ते ही अगदी १७ व्या वर्षी. आपल्या या कामगिरीने त्याने भारताचे नाव पुन्हा एकदा आंतरराष्टीय पटलावर चमकवले आहे. पण यावर तो समाधानी नाही आहे. याचे कारण नाही आश्चर्यचकित करणारे आहे. रमेशबाबू प्रज्ञानंद यांने जरी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभूत केले असले तरी तो यावर खुश नाही आहे. त्याने आपली नाराजी मीडियासमोर एका वेगळ्या प्रकारे व्यक्त केली आहे.



शुक्रवारी चेसबल्स मास्टर्स ऑनलाइन रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत प्रज्ञानानंद आणि मॅग्नस कार्लसन यांचामधील सामना अनिर्णित होत चालला होता. चाळीस मिनिटांनंतर अशा वेगवान स्पर्धेत खेळाडूंना 10 सेकंदांचा वाढीव वेळ मिळतो अशावेळी मॅग्नस कार्लसनने चाळीसावा खेळताना चूक केली. आणि आणि प्रज्ञानंदने याच १० सेंकांदामध्येत हा सामना जिंकला. यामुळे तो विजय मिळवूनही निराश झाला. मिळालेल्या अतिरिक्त वेळेपेक्षा सुरुवातीचे खेळामध्येच जगातील नंबर वन खेळाडूला हरवणे याला जास्त महत्त्व असल्याचे त्याने म्हणले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -