Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगआम्ही पाणी पट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅस दर अर्ध्यावर आणणार का? भाजपशिवसेनेत...

आम्ही पाणी पट्टी अर्ध्यावर आणली, तुम्ही गॅस दर अर्ध्यावर आणणार का? भाजपशिवसेनेत ‘पोस्टर वॉर’

ताजी बातमी ऑनलाईन टीम

औरंगाबाद; विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने महापालिकेवर सोमवारी जल आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे; पण त्याआधीच शहरात भाजप व शिवसेना यांच्यामध्ये पोस्टर वॉर भडकल्याचे चित्र आहे. मोर्चा मार्गावर भाजपने पोस्टर लावल्यानंतर शिवसेनेदेखील पोस्टर लावत भाजपला सवाल केला आहे. ‘आम्ही पाणी पट्टी अर्ध्यावर आणली तुम्ही गॅसचे दर अर्ध्यावर आणणार का ?’ अशी विचारणा पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आली आहे.


उन्हाळा सुरु झाल्यापासून शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने सोमवारी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मनपावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी जोरदार तयारी सुरू असून, मोर्चा मार्गावर पोस्टर लावण्यात आली आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वतीनेही भाजपला घेरण्याची रणनीती आखली आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेनेने देखील भाजपच्या मोर्चा मार्गावर पोस्टर लावले आहेत. एकंदरीत शहरामध्ये पोस्टरवॉरचीच चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -