ताजी बातमी ऑनलाईन टीम
औरंगाबाद शहर काल शनिवारी एका मुलीची गळा चिरुन हत्या (Murder) केली गेल्याने हादरुन गेलं होतं. या घटनेमुळे पोलीस प्रशासनही खडबडून जागं झालं होतं. पोलिसांनी कालपासून आरोपीचा शोध सुरू केला होता. या हत्येनंतर 24 तासाच्या आत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. लासलगावला पोलिसांनी या आरोपीला त्याच्या बहिणीच्या घरून अटक केली. फरार आरोपी शरण सिंग आता पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणात शरण सिंगला ताब्यात घेतले गेले असून त्याच्या सोबत आणखी कोणाचा समावेश आहे का त्याचा शोधही पोलीस घेत आहेत.
देवगिरी कॉलेजमध्ये दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बीबीएच्या प्रथम वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा एकतर्फी प्रेमातून खून करण्यात आला होता. ग्रंथी सुखप्रीत कौर प्रितपालसिंग असं या मृत तरुणीचं नाव आहे. दुपारच्या वेळी भर कॉलेजमधून तिला फरफटत ओढत घेऊन जाऊन नराधमानं तिच्यावर चाकूने वार केले होते. ही घटना पोलिसांनी समजताच पोलीस घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते, मात्र त्यापूर्वीच तरुणीचा त्या हल्ल्यात जीव गेला होता.
पोलीस प्रकरणाच्या मुळाशी जाणार ही घटना घडल्यानंतर आरोपीली पकडण्यासाठी ८ पोलिसांनी हालचाली चालू केल्या होत्या. पोलीस पथकानी वेगवेगळ्या ठिकाणी कसून चौकशी केल्यानंतर आणि सीसीटीव्ही फुटेज पाहून आता एकाला संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन पोलीस कसून चौकशी करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.