ताजी बातमी ऑनलाईन टीम
तलवारी व अमली पदार्थ विकणा-या दिलदार कांबळे यास कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर पोलीसांनी अटक (arrest) केली आहे. कांबळे याच्याकडून सुमारे सहा तलवारी तसेच 1590 ग्रॅम गांजा सदृश अमली पदार्थ (drugs) जप्त करण्यात आले आहेत.
दरम्यान काही दिवसांपासून महाराष्ट्रात तलवार विक्रीच्या प्रकरणात पोलीस संशयित आरोपींना अटक करीत । आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात पोलीस छापे टाकत आहे. जालना येथून देखील काही दिवसांपुर्वी मोठ्या प्रमाणात तलवारी जप्त करण्यात आल्या.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात तलवारी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानूसार शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथे मध्यरात्री पोलीसांनी छापा टाकला. यामध्ये तलवारी विकणारा दिलदार कांबळे यास जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून सहा धारधार तलवारींसह गांजा सदृश अंमली पदार्थ (drugs) जप्त करण्यात आले आहे. कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.