Monday, July 28, 2025
Homeतंत्रज्ञानआता Whatsapp वरून डाउनलोड करता येईल पॅन कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या प्रोसेस

आता Whatsapp वरून डाउनलोड करता येईल पॅन कार्ड-ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या प्रोसेस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लोकांना आता आपल्या पर्समधे पॅन कार्ड ( Pan Card ) आणि ड्रायव्हिंग लायसन्ससह ( Driving License ) इतर महत्त्वाचे दस्ताऐवज ठेवण्यापासून सुटका मिळणार आहे. Whatsapp च्या मदतीने आता हे दस्ताऐवज सहज डाउनलोड करता येणार आहे. नागरिकांना दिलासा देत इलेक्ट्रॉनिक आणि आयटी मंत्रालयाने ही माहिती दिली आहे की, युजर्स Whatsapp वर डिजिलॉकर सेवा ( Whatsapp Digilocker ) वापरू शकतात. ही सुविधा MyGOV हेल्पडेस्कचा वापर करण्यास साक्षम असेल.



सरकारने व्हॅट्सऍपवर MyGOV सुविधा देत मोठा दिलासा दिला आहे. या सुविधेमुळे आता लोकं घरी बसून सुविधेचा लाभ घेऊ शकतात. या सुविधेत डिजिलॉकर खाते बनवणे आणि त्याला प्रमाणित करणे, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, गाडी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट सारखे दस्ताऐवज डाउनलोड कारण्यासह अनेक सुविधा देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे कोणतेही अवश्यक दस्ताऐवज सहज डाउनलोड करता येणार आहे. या सुविधेमुळे वेळेची बचत तसेच वेळेवर दस्ताऐवज वापरण्याची सुविधा मिळणार आहे.


हे दस्ताऐवज ठेवू शकता
व्हॅट्सऍपवर MyGOV हेल्पडेस्कचा वापर करण्याची सुविधा मिळाल्यानंतर सहज पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, सीबीएसई दहावी पास प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) दहावी, बारावीचे गुणपत्रक, विमा पॉलिसी दस्ताऐवज ठेवू शकतात.

असे करा दस्ताऐवज डाउनलोड
– या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला +91 9013151515 या क्रमांकावर Namaste किंवा Hi किंवा Digilocker लिहून पाठवावे लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -