ताजी बातमी ऑनलाईन अर्ज
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे निकाल (10 and 12 result 2022) मे महिन्यात जाहीर होतो. परंतु यंदा काहीसा उशीर होईल. परंतु लवकरच निकाल जाहीर होतील, असे संकेत शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले आहेत. 10 वी, 12 वीचे निकाल 20 जूनपर्यंत जाहीर होतील का? असे विचारल्यास ते म्हणाले, मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
राज्यमंत्री बच्चू कडू हे ABP माझाच्या एका कार्यक्रमात बोलत होते. ते म्हणाले, 10 वी, 12 वीच्या परीक्षांचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर करण्यात येतील. निकालाला उशीर झाला तरी 11 वी च्या प्रवेश प्रक्रिया त्याचबरोबर 12 वीची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करण्यात येतील. यावेळी बच्चू कडू यांनी शिक्षण शेत्रातील अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणाने चर्चा केली.