ताजी बातमी ऑनलाईन टीम
महागाई (Inflation) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाढत्या महागाईला सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price), खाद्य तेलाच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहे. त्याचा परिणाम अन्न धान्यासह इतर वस्तूंवर झाला आहे. अशामध्ये आता सिमेंटच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. सिमेंटचे दर वाढल्यामुळे बांधकाम व्यवसायावर परिणाम होणार आहे. अशामध्ये घरांच्या किमतीमध्ये देखील वाढ होणार (Increase House Prices) आहे. त्यामुळे आता नवीन घर खरेदी करणाऱ्यांना याचा फटका बसणार आहे.
कोरोमंडल किंग. संकर सिमेट या नावाने इंडिया सिमेंट कंपनी भारतीय बाजारात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिया सिमेंटने एका पोत्यामागे 55 रुपयांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिया सिमेंट कंपनीने शुक्रवारी सांगितले की, ही दरवाढ एकावेळी केली जाणार नाही. एक जूनला सिमेंट पोत्याचा दर 20 रुपयांनी वाढवण्यात येईल. त्यानंतर 15 जूनला आणखी 15 रुपयांनी सिमेंट पोत्याचा दर वाढवण्यात येईल. त्यानंतर 1 जुलैला 20 रुपयांनी सिमेंटच्या पोत्याच्या दरामध्ये वाढ होईल. ही दरवाढ टप्प्या टप्प्याने होणार आहे.