ताजी बातमी ऑनलाईन टीम
जर तुम्हीही प्रधानमंत्री जन धन योजनेचा लाभ घेऊन बँकेत जन धन खाते उघडले असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. जन धन खातेधारकांना केंद्र सरकारकडून 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळणार आहे.
तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लगेच जन धन खाते उघडा. या योजनेअंतर्गत बँका, पोस्ट ऑफिस आणि राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये देशातील गरिबांचे झिरो बॅलेन्स खाते उघडले जाते.
या योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात खातेदाराला एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ दिला जातो. यामध्ये अपघात विमाही दिला जातो. खातेदाराला हा लाभ 1,00,000 रुपयांचा अपघाती विमा आणि 30,000 रुपयांच्या सामान्य विम्यासह दिला जातो.
जनधन खातेदाराला काही दुर्घटना घडल्यास 30 हजार रुपये दिले जातात. तसेच खातेदाराचा अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख रुपये दिले जातात. म्हणजेच एकूण 1.30 लाख रुपयांचा लाभ मिळतो.
तुम्हाला सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला जन धन योजनेअंतर्गत बँकेत खाते उघडावे लागेल.हे खाते कोणत्याही बँकेच्या शाखेतून किंवा बिझनेस करस्पॉन्डंट बँक मित्राकडूनही उघडता येईल.
हे खाते शून्य रुपये शिल्लक ठेवून उघडले जाते. या योजनेंतर्गत आतापर्यंत सुमारे 42.37 कोटी लोकांनी देशातील विविध सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये खाती उघडली आहेत.