‘फ्लिपकार्ट’..! ई-काॅमर्स क्षेत्रातील एक मोठं नाव… इथं तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू अगदी स्वस्तात खरेदी करता येतात.. सध्या तुमचा इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार असेल, तर तुमच्यासाठी मोठी संधी आलीय. कारण ‘फ्लिपकार्ट’वर इलेक्ट्राॅनिक वस्तूंवर घसघशीत सुट दिली जाणार आहे..
‘फ्लिपकार्ट’वर (Flipkart) सातत्याने नवनवे सेल जाहीर होत असतात. सध्या तुम्हाला स्मार्टफोन, टिव्ही व इलेक्ट्राॅनिक वस्तू खरेदी करायची असले, तर ‘फ्लिपकार्ट’वर पुन्हा एकदा शानदार सेल सुरु होणार आहे.. येत्या 3 जूनपासून ‘फ्लिपकार्ट बिग बचत धमाल सेल’ सुरु होणार असून, हा सेल 5 जूनपर्यंत चालणार आहे.
Advertisement
‘फ्लिपकार्ट’च्या या सेलमध्ये ‘पे लेटर’ (Flipkart Pay Later) ‘ट्रान्झेक्शन’वर 150 रुपयांपर्यंत सूट मिळणार आहे. सेलमधील सर्व ऑफर्सबाबत अद्याप खुलासा झालेला नाही.. मात्र, या सेलमध्ये स्मार्टफोन, टीव्ही, रेफ्रिजरेटर व इतर प्राॅडक्ट्सवर ‘बंपर डिस्काउंट’ मिळणार आहे. याबाबत सविस्तर जाणून घेऊ या..
‘बिग बचत धमाल सेल’बाबत..
नवीन टीव्ही खरेदीचा विचार असल्यास, ‘फ्लिपकार्ट’चा हा सेल तुमच्यासाठी खूपच फायद्याचा ठरणार आहे. या सेलमध्ये टिव्हीच्या खरेदीवर जवळपास 70 टक्क्यांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. शिवाय, किचन अप्लायन्सेसच्या किंमती 299 रुपयांपासून सुरु होत आहेत.
रेफ्रिजरेटरवरही 55 ‘डिस्काउंट’ मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये फर्निचरवरही ऑफरचा फायदा मिळेल. शिवाय ‘फ्लिपकार्ट ओरिजिनल्स’वर बंपर डिस्काऊंट्स मिळणार आहे. ‘फॅशन प्राॅडक्ट, मोबाईल खरेदीवर धमाकेदार डिस्काउंट दिला जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्सेसरीजवर डिस्काउंट मिळेल.
‘फ्लिपकार्ट’च्या या धमाल सेलमध्ये रोज नवीन डील असणार आहेत. त्यात रोज दुपारी 12 वाजता, सकाळी 8 वाजता आणि संध्याकाळी 4 वाजता या डिलचा लाभ घेता येईल. स्वस्तात वस्तू खरेदी करायची असल्यास, तुम्हाला रोज दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत या सेलमध्ये सहभागी व्हावं लागणार आहे..