Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : भाजपचा कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या हक्कासाठी टाहो मोर्चा

कोल्हापूर : भाजपचा कोल्हापुरात पूरग्रस्तांच्या हक्कासाठी टाहो मोर्चा

पूरग्रस्तांच्या हक्कासाठी आज (दि. १) भाजपच्या वतीने कोल्हापुरात ‘टाहो’ मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील म्हणाले, की शासनाने २०१९ च्या पुराच्या अनुभवातून काही पूर्व तयारी करायला पाहिजे होती. ती झाली नाही, त्यामुळे २०२१ ला पुन्हा पूर आला, पुन्हा लोकांचे संसार पाण्यात बुडाले. त्याची नुकसान भरपाई अजूनही अनेकांनी मिळालेली नाही. त्यामुळे ती सरकारने लवकरात लवकर देऊन यावर्षी पूर येऊच नये याकडे कटाक्षाने लक्ष द्यावे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी भाजपचे सत्यजित कदम, राहुल चिकोडी, समरजितसिंह घाटगे आदी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -