Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमोठी बातमी! टॅक्सी, रिक्षाचा प्रवास महागणार, भाडेवाढ होण्याची शक्यता

मोठी बातमी! टॅक्सी, रिक्षाचा प्रवास महागणार, भाडेवाढ होण्याची शक्यता

वाढत्या महागाईमुळे जनता आधीच त्रस्त असताना मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. इंधनाच्या दरात झालेल्या दरवाढीचे कारण देत मुंबईत टॅक्सी आणि रिक्षा भाडे वाढण्याची शक्यता आहे. मुंबईतील ऑटो रिक्षाचे भाडे लवकरच वाढू शकते असा इशारा रिक्षा युनियनने दिला होता. त्यानुसार ही भाडेवाढ होणार आहे. या भाडे वाढीनंतर मुंबईकरांच्या खिशावर ताण पडणार आहे.
नवीन भाडेवाढीनंतर मुंबईत रिक्षाच्या भाड्यात 2 रुपये तर टॅक्सीच्या भाड्यात 3 रुपयांची वाढ होऊ शकते. त्यानुसार रिक्षाचं भाडे 21 वरुन 23 रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. तर टॅक्सीचे भाडे 25 रुपयांवरून 28 रुपये होण्याची शक्यता आहे.

 

रिक्षा युनियनने दिला होता इशारा

पेट्रोल-डिझेलसह सीएनजी महागल्याने लवकरच भाडेवाढ करणार असल्याचा इशारा मुंबईतील रिक्षा युनियनने दिला होता. सीएनजीच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे, आमच्या परिचालन खर्चात प्रति किमी 1. 31 रुपयांची वाढ झाली आहे असे युनियनचे म्हणणे आहे. सध्या रिक्षाचे किमान भाडे 21 रुपये असून पहिल्या 1.5 किमीनंतर सध्या 14.20 रुपये प्रति किमी भाडे आहे.

 

टॅक्सी युनियनची 5  रुपये भाडेवाढची मागणी

रिक्षा प्रमाणे मुंबई टॅक्सी मेन्स युनियनने देखील भाडेवाढ करण्याची मागणी केली आहे. यासाठी युनियनने खटुआ समितीच्या अहवालाचा आधार घेत या अहवालानुसार, इंधन दरात 25 टक्के वाढ झाल्यानंतर, टॅक्सींच्या भाड्यातही सुधारणा करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. युनियनने किमान 5 रुपये भाडे वाढवण्याची मागणी केली आहे. मात्र, इतकी भाडेवाढ करणे शक्य नाही. त्यामुळे तीन रुपये भाडेवाढ होण्याची शक्यता आहे. सध्या, किमान भाडे 1.5 किमीसाठी 25 रुपये आहे.

 

दरम्यान, मुंबई शहरातील एका प्रमुख ऑटो युनियनचे नेते शशांक राव म्हणाले की, भाडे वाढवणे हा योग्य उपाय नाही, कारण त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर होईल. त्यामुळे सरकारने टॅक्सी आणि रिक्षाचालकांना सवलतीच्या दरात सीएनजी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -