साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणी आरोपी मोहन चौहान याला दोषी ठरवत दिंडोशी सत्र न्यायालयाने आज (दि. २) फाशीची शिक्षा सुनावली. मुंबई येथील साकीनाका परिसरात गेल्या वर्षी 30 वर्षीय महिलेवर बलात्कार झाला होता. त्यानंतर उपचारादरम्यान पीडीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
उपचारादरम्यान पीडीत महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला होता.
या प्रकरणातील आरोपीला मुंबई पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा अवध्या १८ दिवसांत तपास पूर्ण केला होता. त्यानंतर या प्रकरणी पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. दिंडोशी न्यायालयाने आरोपी मोहन चौहान याला बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली आहे.
काय होती घटना?
साकीनाका (Sakinaka Rape Case) येथील खैरानी रोड परिसरात एक ३० वर्षीय महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अशी माहिती पोलिस कंट्रोल रुमला मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव महिलेला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यावेळी महिलेची स्थिती गंभीर होती. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली होती. पण पीडित महिलेचा (Mumbai Rape case) उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवण्यात आला होता. साकीनाका येथे १० सप्टेंबर २०२१ रोजी घडलेल्या संतापजनक घटनेनंतर मुंबई हादरली होती.