Sunday, July 6, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : लग्नसोहळा कोल्हापूरच्या नातेवाईकांना पडला ७० हजार रुपयांना!

कोल्हापूर : लग्नसोहळा कोल्हापूरच्या नातेवाईकांना पडला ७० हजार रुपयांना!

कोल्हापूरहून एक गृहस्थ बेळगाव येथे नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी आले होते. मात्र, या दरम्यान त्यांचे कोल्हापूर येथील घर चोरट्यांनी फोडून सोन्या-चांदीचे दागिने व भांडी असा ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील लाईनबाजार, कसबा बावडा, येथील रहिवाशी मोहन बांदिवडेकर हे आपल्या नातेवाईकाच्या लग्नसोहळ्यासाठी ३१ मे रोजी बेळगाव येथे आले होते. त्यानंतर ते ५ जूनपर्यंत बेळगाव येथे राहिले होते. या दरम्यान त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. आणि सोन्या-चांदीचे दागिने व भांडी असा ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबतची माहिती शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी मोहन बांदिवडेकर यांचा ५ जून रोजी दिली. यानंतर त्यांनी थेट कोल्हापूर गाठले. चोरीच्या प्रकाराची खात्री करून शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -