राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परिक्षेचा ऑनलाईन निकाल बुधवारी जाहीर झाला. यामध्ये कोल्हापूर विभागाचा निकाल 95.07 टक्के लागला असून राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे.
राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे ज्या निकालाकडे लागले होते तो बारावीचा निकाल बुधवारी जाहीर झाला आहे.
राज्याचा एकूण निकाल 94.22 टक्के लागला आहे. कोकण मंडळाचा निकाल सर्वाधिक 97.21 टक्के लागला आहे. तर मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी (90.04 टक्के) आहे. 2020 च्या तुलनेत निकाल 3.56 टक्क्यांनी वाढला आहे. 2021 ला परीक्षा घेण्यात आली नव्हती. यंदाही मुलीच सरस ठरल्या आहेत. 95.35 टक्के विद्यार्थिनी तर 93.29 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच 24 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे.
विद्यार्थ्यांची आकडेवारी :
परीक्षा दिलेले विद्यार्थी : 14 लाख 39 हजार 731
उत्तीर्ण विद्यार्थी : 13 लाख 56 हजार 604
निकालाची टक्केवारी : 94.22 टक्के
विभागानुसार निकाल
पुणे : 93.61 टक्के
नागपूर : 96.52 टक्के
औरंगाबाद : 94.97 टक्के
मुंबई : 90.91 टक्के
कोल्हापूर : 95.07 टक्के
अमरावती : 96.34 टक्के
नाशिक : 95.03 टक्के लातूर : 95.25 टक्के
कोकण : 97.21 टक्के