आळते येथील निलोफर शहाजहान मुल्लाणी या २२ वर्षीय वैद्यकिय पदवीच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने राहत्या घरी ओढणीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. अडीच महिन्यापूर्वी तिच्या आईचा हृदयविकाराने अचानक मृत्यू झाला होता. तेंव्हापासुन ती आईच्या आठवणीने व्याकुळ होऊन मानसिक दडपणाखाली होती.
या तणावामुळे तिने स्वतःची जीवन यात्रा संपविली असावी अशी घटनास्थळी चर्चा होती. या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे. बुधवारी सकाळी वडील दारात पाणी तापवत असताना निलोफर गॅसवर कुकर ठेऊन वरील खोलीत गेली होती. लहान मुलीला वरील खोलीत निलोफरला बोलवायला पाठविले असता तिने ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. दरम्यान डॉक्टरांना आणून तपासणी केली असता ती मयत झाल्याचे सांगण्यात आले. यानंतर या घटनेची माहिती पोलीस पाटील रियाज मुजावर यांना दिली.