ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाड ; हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रतिवर्षीप्रमाणे ज्येष्ठ शुध्द त्रयोदशी तिथीनुसार ३४९ वा राज्याभिषेक दिन सोहळा आज (दि.१२) किल्ले रायगडावर मोठया उत्साही आणि जोशपूर्ण वातावरणात पार पडला. कोकणकडा मित्रमंडळ महाड, शिवराज्याभिषेक दिनोत्सव समिती दुर्गराज रायगड आणि जिल्हा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने हा सोहळा झाला.
यावर्षी राज्याभिषेक सोहळयासाठी शिवभक्तांच्या हजेरीने किल्ले रायगड घोषणाच्या आवाजाने दुमदुमून गेला. हा प्रेरणादायी सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. होळीचा माळ, बाजारपेठ राजदरबार शिवभक्तांनी फुलून गेला होता. सकाळी ध्वजपूजनाने सोहळयाला सुरूवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी राजसदरेकडे निघाली. यावेळी शिवाजी महाराजांचा जयजयकार आणि ढोलताशांच्या निनादाने आसमंत दुमदुमून निघाला होता. हजारो शिवभक्त हातात भगवे झेंडे घेवून नाचत होते. होळीच्या माळावर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके पहायला मिळाली. तर रात्री राजदरबारात जगदंबेचा जागर गोंधळ, शाहिरी पोवाडयांचा कार्यक्रम रंगला होता.
किल्ले रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -