बारावीच्या अभ्यासासोबतच सुशांतने आयआयटीची तयारीही केली होती. IIT JEE मध्ये, सुशांतने संपूर्ण देशात सातवा क्रमांक मिळवला आणि शिक्षणासाठी दिल्ली अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
अभिनयाच्या आवडीमुळे सुशांतने मधेच शिक्षण सोडले आणि मुंबईची वाट धरली. मुंबईत पोहोचल्यानंतर तो श्यामक दावर डान्स ग्रुपमध्ये दाखल झाला. सुशांत उत्तम डान्सर होता. ऑस्ट्रेलियात झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुशांतने ऐश्वर्या रायसोबत ज्युनियर डा– म्हणून डान्स केला होता. ‘किस देश में है मेरा दिल’ या टीव्ही मालिकेतन त्याने करणाऱ्या सुशांतला ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून तुफान लोकप्रियता मिळाली. टीव्ही विश्वात आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर त्याने बॉलिवूडच्या दिशेने आपला मोर्चा वळवला.
‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून सुशांतचे (Sushant Singh Rajput) वृद्धांना आपलं केल, तर बॉलिवूडमध्ये एन्ट्री करुन तरुणांना आपल्या तालावर थिरकायला लावलं. चाहत्यांच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या सुशांतचा मुंबईतील राहत्या घरी मृतदेह आढळल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एक पोकळी तयार झाली.
दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी गळफास लावून घेणाऱ्या सुशांतच्या मृत्यूचं रहस्य आजही उलगडलेलं नाही. सुशांतची हत्या होती आत्महत्या आजही कळू शकलेलं नाही. जाणून घेवू सुशांतबद्दल काही खास गोष्टी.. सुशांत त्याच्या आईच्या फार जवळ होता. अभिनेता 16 वर्षांचा असतानाचं त्याच्या आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर संपूर्ण कुटुंब पाटण्याहून दिल्लीला शिफ्ट झाल.
सुशांतने ‘काय पो चे’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘छिछोरे’मध्ये दमदार भूमिका साकारून बॉलिवूडवर वर्चस्व गाजवलं. सुशांतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’ सुशांतच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झाला.