बारावीनंतर आता साऱ्यांचे लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले आहे.. पुढील दोन दिवसांत हा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.. येत्या 15 जूनपर्यंत हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे बोलले जात आहे..
दरवर्षी दहावी व बारावीच्या बोर्डाचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर होतो. त्याप्रमाणे नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला. आता दहावीचा निकाल जाहीर होणार आहे. दहावी-बारावीचे निकाल जाहीर झाले, की प्रत्येकाचं लक्ष असते, ते मार्कांवर.. विद्यार्थी व पालकही निकालावर किती गुण मिळाले, कोणत्या विषयात किती गुण मिळाले, हे कटाक्षाने पाहतात.
विद्यार्थ्याचं निकालपत्र पाहताना, मार्क तर प्रत्येक जणच पाहतो.. मात्र, या निकालपत्रावर अशाही काही गोष्टी असतात, ज्याकडे दुर्लक्ष केलं जातं.. मात्र, पुढच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना, चुकीच्या बाबी समोर येतात नि मग पश्चातापाची वेळ येते.. त्यामुळे दहावीचा निकाल पाहताना, विद्यार्थी-पालकांनी काही गोष्टींवरही लक्ष ठेवणं आवश्यक आहे..
मार्काबरोबरच ‘हे’ पाहा..
– दहावीचा निकाल भविष्यातील शिक्षणाच्या नि पर्यायाने करिअरच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असतो. त्यामुळे दहावीचा निकाल पाहताना, तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, जन्मतारीख आणि इतर नोंदी महत्त्वाच्या असतात. कारण, या निकालवर जशा नोंदी असतील, तशाच भविष्यात सर्व ठिकाणी येतात.. त्यामुळे या बाबी पाहणं आवश्यक आहे.
ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यावर त्याच्या दोन-तीन प्रिंट्स काढून ठेवाव्यात. शाळेतून किंवा कॉलेजमधून निकालाची ओरिजनल प्रिंट मिळण्यासाठी अनेक दिवस लागतात. मात्र, तोपर्यंत अकरावी व इतर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असते.. त्यामुळे निकालाची प्रिंट घेऊन ठेवणं आवश्यक आहे.
– ऑनलाईन निकाल पाहताना रोल नंबर, आई-वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसेच सर्व गुणांची बेरीज व टक्केवारी तपासून पाहा. तुमच्या व वडिलांच्या नावाचं स्पेलिंग चेक करा, जेणेकरून पुढील अभ्यासक्रमाला प्रवेश घेताना अडचण येणार नाही.