Sunday, July 27, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : कागल महामार्गावर लुटमारीच्या घटनेत वाढ; मारहाण करून तिघांना लुटले

कोल्हापूर : कागल महामार्गावर लुटमारीच्या घटनेत वाढ; मारहाण करून तिघांना लुटले

बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी ते कोगनोळी सिमा तपासणी नाका या दरम्यान लुटमारीच्या तीन घटना घडल्या. अज्ञात चोरट्यांनी मोटरसायकलस्वारांना एकटे गाठून त्यांच्याकडील किमती मोबाईल, मोटरसायकल आणि पैशाचे पाकीट जबरदस्तीने हिसकावून घेऊन पोबारा केला. या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात आज दोघांनी फिर्यादी दाखल केल्या(farmers). श्रेयश बाबासो कांबळे (पिंपळगांव खुर्द) व दत्तात्रय हिंदूराब खापरे (अनंत रोटो वसाहत, कागल) अशी त्यांची नावे आहेत.

श्रेयश कांबळे हा सोमवारी रात्री आपल्या पत्नीला कागल पंचातारांकीत औद्योगिक वसाहतीमधील एका हॉस्पिटलमध्ये कामावर सोडण्यासाठी गेला होता. तेथून रात्री नऊ वाजता श्रेयश आपल्या मोटरसायकलीवरून घरी परत जात होता. महामार्गावर लक्ष्मी | टेकडीच्या उतारावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोपवाटीकेसमोर मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञात तिघा संशयीतांनी श्रेयशला अडविले. त्याला मोटरसायकलीवरून ओढत महामार्गाच्या कडेलाअसलेल्या चरीत नेऊन मारहाण केली. तसेच त्याच्याकडील मोबाईल आणि मोटरसायकल घेऊन पलायन केले. घाबरलेल्या श्रेयशने कागल गाठले. हॉटेल अशोकाजवळ त्याला पिंपळगांव येथील काही ओळखीची लोक भेटले(farmers). घडला प्रकार त्याने या लोकांना सांगितला.  त्यानंतर त्याने कागल पोलिस ठाण्यात याबाबतची फिर्याद दाखल केली. अज्ञात संशयीत चोरट्यांनी पाच हजार रूपयांचा मोबाईल आणि ३० हजार रूपयांची मोटरसायकल घेऊन निपाणीच्या दिशेने पळाल्याचे त्याने फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान कागल अनंतरोटो येथील दत्तात्रय हिंदूराब खापरे रात्री दहा वाजता गोकुळ शिरगांव येथून घरी परत चालले होते. महामार्गावर येथील न्यायालयाच्या समोरील रस्त्यवर ते रात्री दहा वाजता मोबाईलवर बोलत थांबले होते. यावेळी मोटरसायकलीवरून आलेल्या दोघांनी खापरे यांना काही मदत हवी आहे? का अशी विचारणा केली. यावेळी खापरे यांना मोठ्या आवाजात का बोलत आहेस? असे म्हणत दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हातातील मोबाईल खिशातील पाकीट आणि मोटरसायकलीची चावी घेऊन चोरट्यांनी पलायन केले. दरम्यान कोगनोळी सिमा तपासणी नाक्याजवळ कर्नाटकमधील एका मोटरसायकल स्वाराला अशा घटनेला सामोर जावे लागले. सोमवारी रात्री एकाच दिवशी अशा प्रकारच्या तीन घटना घडल्याने लोकांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -