राज्यात काही ठिकाणी पाऊस बऱ्यापैकी झाला असला तरी महाराष्ट्रात अंदाजे 70 टक्के भागातील शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पेरणीसाठी पुरेसा पाऊस न झाल्याने शेतीची काम काही ठिकाणी खोळंबली आहे. शेरकऱ्यांचं पेरणीपूर्व कामांना वेग देणं चालू झालं आहे.
काही दिवसांपूर्वीच 100 मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांना पेरणीची घाई करु नये. शेतात 3 ते 4 इंच ओल जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत पेरणीची घाई करून नये, असा महत्वपूर्ण सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. 10 जूननंतर मुंबई ठाणे पालघर रायगड या जिल्ह्यात मान्सूनने चांगली हजेरी लावली, पण या आठवड्याच्या गेल्या सोमवारपासून मान्सून नाहीसा झाला. पुन्हा हवामानात बदल होऊ लागले आणि ऊन-सावलीचा खेळ सुरू झाला. आता यानंतर पंजाबराव डख यांनी देखील हवामानाचा, पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
पंजाबराव डख यांचा हवामानाचा अंदाज:
पंजाबराव डख यांच्या माहीतीनुसार, मागील काही दिवसापासून राज्यात पाऊस येत आहे, तोही तुरळक ठिकाणीच. पण आता फक्त काही दिवसांतच टप्प्याटप्प्यात राज्यात सगळीकडेच पाऊस पडेल. पंजाबराव डख (Panjabarao Dakh News) यांच्या आताच्या अंदाजानुसार, आज (16 जून) वार गुरुवार रोजी मराठवाड्यामध्ये व पूर्व विदर्भामधील काही जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. पूर्व विदर्भातल्या आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात भाग बदलत बदलत पाऊस पडू शकतो, असा त्यांचा अंदाज आहे.
पंजाबराव डख यांच्या हवामानाच्या अंदाजानुसार, (Panjabrao Dakh Weather Report) 20 जूनपासून ते 26 जूनपर्यंत विदर्भाचा पूर्व भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात काही भाग बदलत बदलत पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. यामुळे अंदाजे 20 जून पासून तरी राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबराव डख साहेबांनी वर्तवला आहे. म्हणजेच शेतीची कामे व्यवस्थित पार पडतील आणि बळीराजावर संकट येणार नाही.
विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :
मध्य महाराष्ट्र : नगर, पुणे.
विदर्भ : अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली
मराठवाडा : उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड.