Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानगुगलचं 'हे' खास फीचर प्रवास सुरु करण्याआधीच देईल टोल खर्चाचा अंदाज

गुगलचं ‘हे’ खास फीचर प्रवास सुरु करण्याआधीच देईल टोल खर्चाचा अंदाज

स्वतःच्या गाडीने प्रवास करायचा म्हटल्यास इंधनासह खाण्यापिण्याचा खर्च आणि टोलचा खर्च येतोच. मात्र आपल्याला जायचे आहे त्या मार्गात किती टोलनाके (Toll Plaza) आहे आणि टोला खर्च (Toll Cost) किती लागेल याबाबत आधीच कळलं तर प्रवासाचे नियोजन (Travel Tips) सोपे होते. ही बाब लक्षात घेत गुगलने (Google New Feature) एक जबरदस्त फीचर सादर केले आहे. या फीचरच्या (Google Maps) मदतीने तुम्ही प्रवास सुरु करण्याआधीच टोलचा किती खर्च येईल हे जाणून घेऊ शकतात.

गुगल मॅपवर हे जबरदस्त फीचर आहे. प्रवास करताना अनेक जण गुगल मॅपचा वापर करतात. युजर्सला अधिक चांगला अनुभव मिळावा यासाठी गुगल मॅपने अनेक नवीन अपडेट्स आणले आहेत. या नव्या अपडेट फीचरमुळे प्रवासादरम्यान किती टोल प्लाझा येतील, किती टोल भरावा लागेल याची माहिती आधीच युजर्सला मिळेल. यासह टोल नसलेल्या दुसऱ्या मार्गाचा पर्याय देखील गुगल मॅपवर दिसणार आहे. त्यामुळे कोणता मार्ग निवडावा याचा निर्णय प्रवाशांना घेता येईल. गुगलवर टोल रोड प्रोसेसिंग ही सुविधा अँड्रॉइड आणि ios वर आहे. या फीचरमध्ये अमेरिका, भारत, जपान, इंडोनेशिया या देशातील 2000 टोल रोडची माहिती युजर्सला मिळणार आहे. गुगल मॅपवर दाखवण्यात आलेले टोल आणि टोलची किंमत स्थानिक टोलिंग प्राधिकरणाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारवर आहे.

टोल फ्री मार्गाची देखील माहिती मिळणार

प्रवासादरम्यान, टोल फ्री मार्ग शोधणाऱ्या युजर्सला गुगल मॅप टोल फ्री मार्गाचा पर्याय देखील सुचवेल. ज्यांना टोल असलेला मार्ग पूर्णपणे टाळायचा असेल त्यांनी गुगल मॅपवर डायरेक्शनच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या तीन डॉटवर क्लिक करून एक ऑप्शन निवडावा लागेल, त्यानंतर युजर्सला टोल फ्री रस्त्यांची माहिती मिळेल.

अपघात प्रवण क्षेत्राचा देखील मिळणार अलर्ट

दरम्यान, ड्रायव्हिंग करताना जर तुम्ही अपघात प्रवण क्षेत्रात (Accidental Area) पोहोचल्यास या फीचरच्या मदतीने तुमच्या मोबाईल फोनवर अलर्ट मेसेज येईल. यात ऑडिओ किंवा व्हिज्युअल अलर्ट तुमच्या फोनवर दिला जाईल. यासाठी Mapmyindia चं Move App डाऊनलोड करावं लागेल. हे App केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी लॉंच केले होते. Mapmyindia ने IIT Madras सहा मिळून हे App डेव्हलप केलं आहे. हे App युजर्सला त्याच्या मार्गात येणाऱ्या ब्लॅक स्पॉटबाबत अलर्ट करेल. जेणेकरून गाडी चालवताना चालक खबरदारी घेईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -