Monday, December 23, 2024
Homeराजकीय घडामोडीशरद पवार राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी का देतायेत वारंवार नकार? काय आहे गेम...

शरद पवार राष्ट्रपती निवडणूक लढवण्यासाठी का देतायेत वारंवार नकार? काय आहे गेम प्लॅन? वाचा पाच कारणे

पुढील महिनाभरवर असलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चर्चेत असलेल्या शरद पवारांनी (Sharad Pawar)काही दिवसांपूर्वीच यापासून स्वताला दूर केले आहे. बुधवारी ममता बॅनर्जी (Mamta Banarjee)yif aliastmel विरोधकांच्या बैठकीला त्यांनी उपस्थिती लावली. या बैठकीत आणि त्यापूर्वीही ही राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी, असा आग्रह विरोधकांकडून त्यांना करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र शरद पवारांनी नम्रतेने ही ऑफर नाकारल्याची माहिती आहे. ही बैठक सुमारे दोन तास चालली. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची नामांकन प्रक्रिया बुधवारपासून सुरु होणार आहे. दुसरीकडे अशीही बातमी आहे की शरद पवार यांनी अजून एक दुसरी बैठक बोलावली आहे. ही बैठक २० किंवा २१ जूनला मुंबईत होण्याची शक्यता आहे. जर शरद पवार राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू इच्छित नाही, तर त्यांनी ही निवडणूक का बोलावली असेल, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

शरद पवारांना खरचं राष्ट्रपती का व्हायचे नाही, काय आहेत कारणे?

1 .सक्रिय राजकारणातून नवृत्ती नको
शरद पवार यांची ओळख ही लोकनेता अशी आहे जनतेत वावरणारा नेता, त्यांचे प्रश्न समजणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. राष्ट्रपतीपद मिळाल्यानंतर सक्रिय राजकारणातून निवृत्ती असेच त्याच्याकडे पाहिले जाते. शरद पवार यांचे नाव यापूर्वीही एक-दोनदा चर्चेत आले आहे, त्यावेळीही त्यांनी सक्रिय राजकारणातून इतक्या लवकर निवृत्ती नको, असे सांगत नम्रतेने तेव्हाही ऑफर नाकारली होती. केवळ राष्ट्रपती भवनात राहणे आणि प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत फारसे महत्त्व नसलेले पद पवारांसारख्या व्यक्तीला नको असण्याचीही शक्यता आहे. सामान्य जनतेशी त्यांचा असलेला संपर्कही या पदामुळे तुटेल, असे त्यांना वाटत असावे. असे जाणकार सांगतात.

2 . निवडणूक जिंकण्याची शक्यता कमी
राष्ट्रपती निवडणूक एनडीएसमोर जिंकणे सोपे नसल्याचे शरद पवारांना माहित आहे, हेही यातील एक महत्त्वाचे कारण मानण्यात येते. कारण विजयासाठी आवश्यक असलेले संख्याबळ विरोधकांकडे नाही. लोकसभेत विरोधकांची मते तुलनेत कमी आहेत. राज्यसभेत आणि विधानसभेत विरोधकांची परिस्थिती बरी आहे. दुसरीकडे विरोधकांतही एकजूट दिसत नाहीये. अशा स्थितीत रिस्क घेण्याची पवारांची तयारी तूर्तास तरी दिसत नाहीये.

3 .नरेंद्र मोदींशी संबंध बिघडण्याची शक्यता
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात सौहार्दाचे संबंध आहेकत. अशा स्थितीत युपीए किंवा विरोधकांकडून राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणे, हे थेट मोदींना आव्हान ठरु शकते. त्यामुळे उमेदवार म्हणून रिंगणात उतरुन मोदींशी संबंध बिघडवून घेण्याची पवारांची तयारी नसल्याचे सांगण्यात येते आहे.

4 .2024 लोकसभा निवडणूक महत्त्वाची
शरद पवार यांनी देशाचे पंतप्रधान व्हावे, अशी महराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे. पवारांचीही ती महत्त्वाकांक्षा असण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत 2024 सालच्या लोकसभा निवडणुकांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती आहे. तिसरी आघाडी उभारुन भाजपाला लढत देण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळेही 2024 सालच्या निवडणुकांसाठी ते तयारी करत असल्यामुळे त्यांना राष्ट्रपती पद नको असण्याची शक्यता आहे.

5 . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून अंतर नको
राज्यात त्यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही अनेक गट-तट आहेत. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील छुप्या संघर्षाबाबतही अनेकदा चर्चा होते. अशा स्थितीत पवार राष्ट्रपती झाले, तर राज्यात पक्षात फाटाफूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्यामुळेही पवार या पदासाठी इच्छुक नसल्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -