ताजी बातमी ऑनलाईन टीम
एकजण बचावला; कारदग्यातील घटना
येथील पुर बंगाली देवस्थानच्या दर्शनासाठी आलेल्या इचलकरंजी येथील सोहेल शब्बीर बोडे (वय १४) याचा नदीमध्ये अंघोळीसाठी गेला असता बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर इम्रान – मेहबूब बोडे वय १७, दोघे रा. जवाहर नगर इचलकरंजी हा नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला आहे. सदरची घटना दुपारी ४ वाजता घडली. सदर बालकाचा मृतदेह शोधून काढण्यासाठी अग्निशामक दल व राष्ट्रीय आपत्ती पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्या अथक परिश्रमातून अखेर तीन तासाने सदर बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री मृतदेहाचे सदलगा येथे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर घटनेची नोंद सदलगा पोलिस ठाण्यांमध्ये झाली आहे.
अधिक माहिती की, इचलकरंजी येथील काही मुस्लिम युवक पीर बंगाली देवाच्या दर्शनासाठी दुपारी कारंजा येथे आले .
होते. त्यांनी जेवणाचा बेतही आखला होता. तत्पूर्वी अंघोळ करून सर्वजण जेवणास बसणार होते. त्यामुळे घाटावर अंघोळीसाठी गेलेला सोहेल शब्बीर बोडे व इम्रान मेहबूब बोडे दोघेजण पाण्यात उतरले. पण त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने दोघेही बुडाले. यावेळी सदर मुले बुडत असताना काही नागरिकांनी पाहिले. त्यामधील एकाला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले.
पण सोहेल बुडाल्याने तो कोणाच्या हाती लागला नाही. सर्वांनी त्याचा शोध घेतला पण तो सापडला नाही. सदर घटनेची माहिती ग्रामपंचायत अध्यक्ष राजू खिचडे, माजी अध्यक्ष सुदिपसिंह उगळे व ग्रामपंचायत सदस्यांना माहिती मिळताच ते दुधगंगा नदीवर धाव घेऊन पाहणी केली. सदलगा पोलिस ठाण्यालाही कळविण्यात आले. सदर बालकाचा शोध लागत नसल्याने अखेर अग्निशामक दल व आपत्ती व्यवस्थापन टिमला पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांच्या अथक परिश्रमाने सुमारे तीन तासांनी सदर बालकाचा मृतदेह हाती लागला. मृतदेह बाहेर काढताच नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला होता. सदलगा येथे मृतदेहाचे शवविच्छेदन करुन नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
इचलकरंजी मधील बालकाचा नदीत बुडून मृत्यू
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -