वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘फादर्स डे’ (Father’s Day) साजरा केला जातो. दरवर्षी फादर्स डे जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी साजरा (Father’s Day) केला जातो. यंदा 19 जून रोजी ‘फादर्स डे’ साजरा केला जात आहे. तुम्हाला फादर्स डे साजरा करण्यासाठी बाहेर जान्याची गरज नाही. तुम्ही घरी राहून अनेक प्रकारे फादर्स डे (Father’s Day Celebrating Tips) साजरा करू शकता. वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे तुमच्या वडिलांना आनंद वाटेल असे काही विशेष (Father’s Day Tips) तुम्ही करू शकता. यासाठी आज आम्ही तुमची मदत करत आहोत. या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुम्ही घरी फादर्स डे कसा साजरा करू शकता.
असा साजरा करा ‘फादर्स डे’
वडिलांचा आवडत चित्रपट प्लॅन करा – ‘फादर्स डे’ला तुम्ही घरीच एखादा चित्रपट प्लॅन करू शकता. तुमच्या वडिलांना आवडणारा चित्रपट तुम्ही पाहू शकता. तो चित्रपट तुम्ही तुमच्या वडिलांसोबत पाहू शकतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही या दिवशी तुमच्या घराला चित्रपटगृहाचा लूक देऊ शकता. यामुळे तुमच्या वडिलांना स्पेशल फील होईल.
वृक्षरोपण- या दिवशी तुम्ही घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात वेगवेगळी रोपे लावू शकता. यातील एखादा रोप तुम्ही तुमच्या वडिलांना भेट म्हणून देऊ शकता. यामुळे तणाव दूर होतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यासह तुम्ही तुमच्या परिसरात एखाद्या ठिकाणी वृक्षरोपण देखील करू शकता.
कृतज्ञता व्यक्त करा- फादर्स डेच्या दिवशी वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे त्यांना सांगा. तुमचे हे शब्द तुमच्या वडिलांना खूप आनंद देतील.
आवडतं जेवण बनवा- फादर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या वडिलांसाठी त्यांच्या आवडीचं जेवण बनवू शकता. तुम्हाला वाटल्यास तुम्ही वाडिलांसोबत जेवण बनवू शकता. यामुळे तुमच्या नात्यात प्रेम वाढेल.