Tuesday, December 24, 2024
Homeराजकीय घडामोडीविधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान, दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची धावपळ

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान, दुसऱ्या उमेदवारासाठी काँग्रेसची धावपळ

विधानपरिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान (Voting for 10 seats) प्रक्रिया पाडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपापले आमदार वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधानपरिषदेसाठी (Maharashtra Vidhan Parishad) महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्ष अधिक सतर्क झाले आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. तसाच काँग्रेसचाही (Vidhan Parishad Election) एक आमदार सहज जिंकू शकतो. परंतु दुसरा उमेदवार निवडून आणण्याचं कॉंग्रेससमोर मोठं आव्हान आहे.

दरम्यान, राज्यसभेत शिवसेनेला झटका बसल्यानंतर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने त्यातून धडा घेतला आहे. काँग्रेसने आधीपासूनच सतर्क राहून आपले सर्व आमदार वरळी इथल्या फोर सिझन हॉटेलमध्ये ठेवले आहेत. हॉटेलबाहेर दोन बस तैनात असून काँग्रेसचे हे सर्व 44 आमदार या दोन्ही बसमधून विधानभवनात मतदानासाठी दाखल होणार आहे.

काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. परंतु दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसला अतिरिक्त 10 मतांची गरज आहे. त्यामुळे ही 10 मत जमवण्यात काँग्रेसला यश येते का हे पाहावे लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -