Saturday, July 5, 2025
Homeराजकीय घडामोडीEknath Shinde यांची Facebook Post होतेय व्हायरल, भाजपमध्ये जाण्याचे दिले संकेत?

Eknath Shinde यांची Facebook Post होतेय व्हायरल, भाजपमध्ये जाण्याचे दिले संकेत?

नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी त्सुनामी आली आहे. सत्ताधारी महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष असलेल्या शिवसेनेत उभी फूट (Shiv Sena Crisis) पडल्याची पाहायला मिळत आहे. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे दिग्गज नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde not reachable) यांच्यासह 25 आमदार नॉट रिचेबल आहेत. सोमवारी संध्याकाळपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde News) यांच्यासह इतर काही आमदारांशी शिवसेनेचा संपर्क होऊ शकलेला नाही. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi Sarkar) संकटांत सापडल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अशातच एकनाथ शिंदे यांची फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वीच फेसबुकवर एक सूचक पोस्ट केली आहे. ‘संतुलित मन सुखी निरोदी समृद्ध जीवनाचा राजमार्ग म्हणजे योग, असे एकनाथ शिंदे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपच्या वाटेवर असल्याची देखील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

एकनाथ शिंदे हे थेट शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत डावल्याची भावना एकनाथ शिंदे यांच्या मनात निर्माण झाली असल्याचे समजते.

दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच संतापल्याची माहिती मिळाली आहे. मध्यरात्रीपासून उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या महत्त्वपूर्ण नेत्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू केला आहे. आता या बैठकीला एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार उपस्थित राहातात का, हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -