इंटरनेट सेन्सेशन टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद तिच्या बोल्डनेसमुळे कामय चर्चेत असते. आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर कहर करते. तिच्या या हॉट आणि बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढवण्याचे काम उर्फी करते. नुकताच उर्फी जावेदने मुंबईच्या पावसात भिजण्याचा आनंद घेतला. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
कधी बिकिनी तर कधी हटक्या आणि तोकड्या कपड्यांमध्ये दिसणारी उर्फी नुकताच व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये चक्क साडीत दिसत आहे. उर्फी जावेदला साडीमध्ये पाहून नेटिझन्सला धक्का बसला. उर्फी जावेदने मुंबईच्या पावसात भिजताना चक्क आग लावून टाकली आहे. साडीमध्ये उर्फी जावेदचे सौंदर्य आणखीन खूलून दिसत होते. आपल्या हटके कपड्यांच्या स्टाईलमुळे नेहमी चर्चेत राहणारी उर्फी जावेद या व्हिडिओमुळे सुद्धा पुन्हा चर्चेत आली आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये उर्फी छत्री घेऊन पावसामध्ये नाचताना दिसत आहे. सुरुवातीला नाईट सूट घालून पावसामध्ये नाचणारी उर्फी जावेद अचानक सर्वांना साडीमध्ये दिसते. पिंक कलच्या साडीमध्ये उर्फी जावेद खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. या पावसामध्ये उर्फी जावेद ओलिचिंब झाल्याचे दिसत आहे. उर्फीचा हा क्यूट छोट्या व्हिडिओला नेटिझन्सनी खूप चांगली पसंती दिली आहे. तिचे चाहतेही उर्फीवर भरभरून प्रेमाचा वर्षाव करत आहेत. तिची यावेळीची ही स्टाइल सगळ्यांनाच आवडली आहे.