ताजी बातमी ऑनलाईन टीम
विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील उद्धव ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय उलथापालथ सुरु झाली आहे. या राजकीय भूकंपानंतर मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा न देताच आपले शासकीय निवासस्थान वर्षा बंगला सोडले आणि आपला मुक्काम मातोश्रीवर हलवला. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातूनच वर्षा बंगला सोडणार असल्याचे सांगितले होते.
एकीकडे महाराष्ट्रात राजकारण तापले आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ असलेल्या आमदारांची संख्या वाढत चालली आहे. शिवसेनेचे आणि काही अपक्ष आमदार शिंदे गटात सहभागी होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा बंड शमवण्यासाठी शिवसेनेचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांनी मुख्यमंत्र्याचा निरोप घेऊन सुरतमध्ये एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पण एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेसमोर चार अटी ठेवल्या.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आज आपल्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार असल्याचा दावा केला आहे. त्याचसोबत काही अपक्ष आमदार देखील आपल्यासोबत असून आणखी काही जण सहभागी होण्यार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयामुळे सर्वांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे नक्की काय होणार ठाकरे सरकार पडणार की काय अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहेत. या संदर्भातील सर्व घडामोडींवर या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आपण नजर ठेवणार आहोत. येथे पुढे जाणून घेऊया या बातमी संदर्भातील सर्व महात्त्वाच्या घडामोडी
एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांसाठी सर्व सुविधा पुरवण्यामागे भाजपाचा हात – शरद पवार
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -