Monday, November 24, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात उद्या शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

कोल्हापुरात उद्या शिवसैनिकांचे शक्तिप्रदर्शन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : उद्धव साहेब, तुम्हीच आमचे कुटुंबप्रमुख, आम्ही तुमच्या पाठीशी… असे म्हणत आज कोल्हापुरात शिवसैनिक रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन करणार आहेत. आज, शुक्रवारी सकाळी ११ वाजता दसरा चौकातून छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होणारी पदयात्रा शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून संघर्षाची धार तीव्र होणार आहे.

शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या पदयात्रेत खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्यासह कट्टर शिवसैनिक सहभागी होणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -