ताजी बातमी ऑनलाईन टीम
अग्निपथ योजनेंतर्गत भारतीय वायू दलात अग्निवीरांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार 24 जूनपासून उमेदवारांना नोंदणी करता येणार आहे. यासाठी ऑनलाइन परीक्षा एक महिन्यानंतर म्हणजेच 24 जुलै रोजी घेण्यात येणार आहे.
अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण यावर्षी डिसेंबरपासून सुरू होणार आहे. 19 जून रोजी अग्निपथ योजनेवरून झालेल्या गदारोळादरम्यान वायू दलाने या नवीन योजनेबद्दल सर्व तपशील शेअर केले होते.
इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय वायू दलाची अधिकृत वेबसाइट indianairforce.nic.in वर जारी केलेल्या अधिसूचनेत अर्ज, निवड आणि भरतीची तपशीलवार माहिती तपासू शकतात. ऑनलाइन नोंदणी 24 जूनपासून सुरू झाली असून 05 जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
अग्निवीर वायु भरतीसाठी ऑनलाइन नोंदणी अनिवार्य आहे. यासाठी agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील. अधिकृत वेब पोर्टल लाइव्ह असेल. उमेदवार त्यांच्या मूलभूत तपशीलांसह नोंदणी करू शकतील ज्यानंतर ऑनलाइन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म सबमिट करण्यासाठी रु.250/- अर्जाची फी देखील जमा करावी लागेल.
अग्निवीर होण्यासाठी आजच करा नोंदणी, जाणून घ्या कसा करावा अर्ज?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -