पलूस तालुक्यातील ब्रम्हनाळ येथील डॉ. रफिक तांबोळी यांची स्विफ्ट डिजायर चारचाकी कार पेटविण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केला असून यामुळे गावात खळबळ माजली आहे.
डॉ. तांबोळी यांनी काही दिवसापूर्वी चारचाकी गाडी घेतली असून नेहमी प्रमाणे त्यांनी गाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात पार्किंग केली होती. शनिवारी रात्री अज्ञाताने जवलनशील पदार्थ टाकून गाडी पेटविण्याचा प्रयत्न केला आहे.
रात्री पावसामुळे आग विझली असावी त्यामुळे गाडीचे फार नुकसान झाले नाही. परंतु प्रत्यक्षदर्शीनी पाहिले असता संपर्ण गाडी पेटविण्याचा प्रयत्न होता असं दिसत आहे. याप्रकरणी भिलवडी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.