दोन फ्लॅट व तीन मोठे रिकामे गाळे विकत देण्याचे आमिष दाखवून दोघांनी २ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक (fraud) केली आहे. या प्रकरणी संशयित गणेश प्रकाश चव्हाण (रा. आर. बी. मार्ग मुंबई) व जयश्री प्रशांत मुळेकर (रा. माहिम मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. इम्तियाज अब्दुल शेख (वय ४०, शिर्डी, मूळ कुलाबा मुंबई) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
आयटी कंपनीत नोकरीला असणारे इम्तियाज शेख यांनी जानेवारी २०१९ ते २७ जून २०२२ या कालावधीत कोल्हापुरातील फुलेवाडी रोडवर असणाऱ्या एका मोठ्या टॉवर्समधील दोन फ्लॅट व बेसमेंटमधील १००० स्के. फुटांचा गाळा, ग्राऊंड फ्लोअरवरील १५०० स्क्के. फुटांचा गाळा, पहिल्या मजल्यावरील १५००० स्के. फुटांचा गाळा अशा मिळकती खरेदी करून दस्तही केला होता. त्यासाठी २ कोटी ७५ लाख रुपयांची रक्कम वेळोवेळी संशयितांना दिली होती, मात्र संशयितांनी विक्री केलेली ही मालमत्ता दुसऱ्यांना पुन्हा विकूण मूळ खरेदी करणाऱ्यांना अंधारात ठेवून त्यांची फसवणूक(fraud) केली. शेख हे कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जाऊन २७ जून रोजी याबाबतची तक्रार दाखल केली.