महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Political Crises) दिवसेंदिवस वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनाविरुद्ध शिवसेना अशा सत्तासंघर्षाचा आठवा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Maharashtra Governor Bhagatsigh Koshyari) यांची मंगळवारी रात्री उशीरा भेट घेवून बहुमताचा दावा केला आहे. महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांकडे फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे. दुसरीकडे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाला प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे सरकारचे मंत्री आणि शिवसेना तसेच अपक्ष आमदारांनी गुवाहाटी गाठत एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. या बंडानंतर आता अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेकडून शिंदेंची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे पण ते आपल्या अटींवर ठाम आहेत. सध्या राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्यांच्यावर सुरुच आहेत.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आम्ही महाराष्ट्र सरकारला पत्र दिले असून शिवसेनेचे 39 आमदार राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सरकारसोबत राहू इच्छित नसल्याचे सांगत आहेत.यावरून एमव्हीए सरकारने बहुमत गमावल्याचे दिसून येते. आम्ही राज्यपालांना विनंती केली आहे की त्यांनी तत्काळ मुख्यमंत्र्यांना फ्लोअर टेस्टद्वारे बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश द्यावे. दरम्यान 8 अपक्ष आमदारांनीही महाराष्ट्राच्या राज्यपालांना मेल पाठवून लवकरात लवकर फ्लोअर टेस्ट करण्याची मागणी केली आहे.