भारत आणि आयर्लंड (IND vs IRE) यांच्यात दोन सामन्यांची टी-20 मालिका पार पडली. भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात फलंदाजांनी दमदार खेळी करून आयर्लंडविरूद्ध मोठा विजय खेचून आणला आणि मालिका 2-0 ने जिंकली. या सामन्यात आयपीएल गाजवणाऱ्या अष्टपैलू दीपक हुड्डाने शतक केलं तर संजू सॅमसननेही अर्धशतकी खेळी केली.
दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडसमोर 226 धावांचे आव्हान ठेवले होते. दीपक हुड्डाने 104 धावा आणि सॅमसनने 77 धावांची तडाखेबाज खेळी केली. यानंतर मैदानात उतरलेल्या आयर्लंड संघाने 221 धावा केल्या. भारताने हा सामना 4 धावांनी हा सामना जिंकला.
भारताने जेव्हा 20 षटके खेळली तेव्हा त्यांच्या धावफलकावर 7 बाद 227 धावा दाखवण्यात आल्या. त्यामुळे आयर्लंडला विजयासाठी 228 धावा हव्यात असं चाहत्यांना आणि क्रिकेट फॅन्सला लगेच समजलं. पण त्यानंतर जेव्हा आयर्लंडचा संघ फलंदाजीला आला तेव्हा मात्र त्यांच्यासमोर 226 धावांचे आव्हान ठेवण्यात आले होते. मग असं कसं झालं..? घोळ कुठे झाला, हे काही कळेना!
मग सामन्याच्या 20व्या षटकामध्ये ही चूक झाल्याचं समोर आलं. भारताचा कर्णधार हार्दिक पंड्या हा फलंदाजी करत होता. 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा काढण्यात आल्या अशी नोंद करण्यात आली आणि त्यानंतर भारताने आयर्लंडपुढे 228 धावांचे आव्हान ठेवले, असे सांगण्यात आले. पण त्यानंतर मात्र ही चूक उमगली. कारण 20व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर हार्दिक पंड्याने एकही धाव घेतली नव्हती, पण धावसंख्येत अचानक दोन धावा वाढल्या. पण नंतर चूक त्यानंतर सुधारण्यात आली. त्यानंतर लगेच भारताच्या धावसंख्येतून 2 धावा कमी केल्या गेल्या आणि आयर्लंडपुढे 226 धावांचं आव्हान भारताकडून देण्यात आलं.