Friday, November 22, 2024
Homeबिजनेसमहागाईचा अजून एक झटका; ‘या’ कार कंपनीने वाढवले वाहनांचे दर

महागाईचा अजून एक झटका; ‘या’ कार कंपनीने वाढवले वाहनांचे दर

मागच्या काही महिन्यांपासून भारतात इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर निर्मितीचा ओघ सुरु आहे. चारचाकी व्हेरियंटमध्ये टाटा मोटर्स कंपनी विशेष काम करत आहे. आता टाटा मोटर्सकडून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनाच्या किमतीत वाढ केली आहे.

टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनाच्या किमतीत 1.5 ते 2.5 टक्क्यांनी वाढ करणार आहे. वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करण्यासाठीकंपनीने किंमत वाढीचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही वाढ 1.5 ते 2.5 टक्क्यांच्या श्रेणीमध्ये असणार आहे.

भिन्न मॉडेल आणि व्हेरियंटनुसार ही किंमत वेगवेगळी असणार आहे. 1 जुलै 2022 पासून वाहनांच्या किंमतीवर वाढ लागू होणार आहे. सध्या देशभरात आणि जगात स्टील, ऍल्युमिनिअम आणि इतर धातूंच्या किंमती वाढल्यामुळे व्यावसायिक वाहनांच्या किंमतीमध्ये वाढ होणार आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यामध्ये टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमती 1.1 टक्क्यांनी तर व्यावसायिक वाहनांच्या किमती 2 – 2.5 टक्क्यांनी वाढ झाल्याची घोषणा केली होती. कंपनीचं मागच्या काही दिवसांमध्ये झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी ही वाढ केली आहे असं देखील बोललं जातं आहे.

टाटा मोटर्सचा वाहन विक्रीचा अहवाल बघता व्यावसायिक वाहनांची विक्री मे महिन्यात वाढून 31,414 युनिट्सवर पोहोचली आहे जी गेल्या वर्षी याच कालावधीत 9,371 युनिट्स होती. मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कोविड-19 मुळे कंपनीची एकूण विक्री 26,661 युनिट्स होती. टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून गेल्या महिन्यात त्यांच्या Ace कॉम्पॅक्ट ट्रकचा इलेक्ट्रिक व्हेरिएंट लॉन्च केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -