मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. तर दुसऱ्या बाजूला देखील संतापाची लाट शिवसैनिकांमध्ये आहे. अशा परिस्थितीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना आवाहन केल्यानंतर कोल्हापुरात रस्त्यावर न उतरता कट्टर शिवसैनिकांनी ताराराणी चौकात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ पोस्टर झळकवले आहे.
हलाहल! त्रिनेत्र तो मी तुम्हांसी तैसाची गिळूनी जिरवतो! अशा आशयाचे पोष्टर झळकवून उद्धव साहेब शिवसैनिक सदैव तुमच्यासोबत अशी साद घातली आहे.