Monday, August 4, 2025
Homeराजकीय घडामोडीभाजपसोबत युती करणार नाही, येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : राजू शेट्टी

भाजपसोबत युती करणार नाही, येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढणार : राजू शेट्टी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (election news) निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा दिला आहे. माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी सुरू केलेल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी ते आले होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत चर्चा करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. सध्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाशी युती करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. कोणास वाईट म्हणायचे आणि कोणास चांगले म्हणायचे हा प्रश्न पडला आहे.

कोणतेच सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत नाही. बळीराजाला नागवले जात आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे. सध्या विधानसभेची स्थिती नगरपालिकेसारखी झाली आहे. त्यामुळे सध्याच्या सरकारमध्ये लोकशाही राहिली नाही याच्या वेदना आम्हाला होतात त्यामुळे मी येत्या निवडणुकांत कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही. स्वबळावर लढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्याचबरोबर विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत कधीच भाजपशी युती करणार नाही असं त्यांनी सांगितलं. दरम्यान माळशिरस तालुक्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अजित बोरकर यांनी निमगाव पाटीविझोरी (ता. माळशिरस) येथे संपर्क कार्यालय सुरू केलं आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी आले होते. यावेळी त्यांनी मोजक्या कार्यकर्त्यांसोबत बंद खोलीत तासभर चर्चा केली आहे. यावेळी येणाऱ्या पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. राजू शेट्टी यांच्या इशाऱ्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटना येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढवणार का? की ठराविक जागेवर लढणार याकडे लक्ष लागलेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -