Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगGST: सर्वसामान्यांना झटका! 18 जुलैपासून जेवणही महागणार, जाणून घ्या काय काय महागणार......

GST: सर्वसामान्यांना झटका! 18 जुलैपासून जेवणही महागणार, जाणून घ्या काय काय महागणार… संपूर्ण लिस्ट

महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्या किचनचं बजेट कोलमडणार आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूचें दर आणखी वाढणार आहेत. नुकतीत जीएसटी काउंसिल (GST Council) ची 47 वी बैठक झाली.काही वस्तू जीएसटीच्या कक्षेत आणण्यात आल्या आहेत. त्यांच्यावर आधी जीएसटी (GST) लागू नव्हता. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयांमुळे येत्या 18 जुलैपासून काही वस्तू महागणार आहेत. तर काही वस्तू आणि सेवा स्वस्त होणार आहेत.

मनीकंट्रोलच्या रिपोर्ट्सनुसार,जीएसटी काउंसिलच्या बैठकीनंतर 29 जून रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत महसूल सचिव तरुण बजाज यांनी 18 जुलैपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे येत्या 18 जुलैपासून टेट्रा पॅक असलेले दही, लस्सी आदी खाद्यपदार्थ महागणार आहेत. इतकंच नाही तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे देखील महागणार आहे.

या वस्तू-पदार्थ महागणार..

– टेट्रा पॅक असलेले दही, लस्सी आणि बटर मिल्ववर आधी जीएसटी लागत नव्हता. परंतु आता हे पदार्थ जीएसटीच्या कक्षेत आले आहेत. 18 जुलैपासून या पदार्थावर 5 टक्के दराने जीएसटी आकारण्यात येईल.
– चेक बुकसाठी आकारण्यात येणाऱ्या शुक्लात वाढ करण्यात आली आहे. चेक बुकसाठी लागणाऱ्या शुल्कावर बँका आता 18 टक्क्यांने जीएसटी द्यावा लागेल.
– हॉस्पिटलमध्ये 5000 रुपयांपेक्षा (विना-आयसीयू) जास्त भाडे असलेल्या खोलीच्या प्रतिदिन शुक्लावर 5 टक्के अतिरिक्त जीएसटी द्यावा लागेल.
– एटलससह सर्व प्रकारच्या मॅप आणि शुल्कावर 12 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल.
– हॉटेलमध्ये प्रति दिन 1000 रुपयांहून कमी भाडे असलेल्या खोलीसाठी 12 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल. आधी यासाठी जीएसटी आकारला जात नव्हता.
– एलईडी लाइट्स, एलईडी लॅम्पवरील जीएसटी 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे.
– ब्लेड, पेपर कात्री, पेंसिल शार्पनर, चमचा, काटा चमचा, स्किमर्स आणि केक-सर्व्हर्स आदीवर 18 टक्के दराने जीएसटी द्यावा लागेल. सध्या यावर 12 टक्के जीएसटी आकारला जात आहे.

या वस्तू -सेवा स्वस्त होणार…

– रोपवेच्या माध्यमातून प्रवास किंवा सामान ट्रान्सपोर्टसाठी लागणाऱ्या जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. आधी यावर 18 टक्के जीएसटी आकारला जात होता. आता केवळ 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.
– स्प्लिंट्स आणि इतर फ्रॅक्चर उपकरण, शरीराचे कृत्रिम अवयव, बॉडी इंप्लाट्स, इंट्रा ओक्यूलर लेंस आदीवर आधी 12 टक्के जीएसटी आकारण्यात येणार होतात. आता केवळ 5 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.
– माल वाहतुकीवरील भाड्यावरील जीएसटीमध्ये कपात करण्यात आली आहे. आता 12 टक्के जीएसटी आकारण्यात येईल.
– डिफेंस फोर्सेससाठी इंपोर्ट करण्यात आलेल्या वस्तूवर 18 जुलैपासून जीएसटी लागेल.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -