यंदा जून महिन्याच्या अखेर पासून सुरुवात झालेला पाऊस काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. राज्यातील अनेक जिल्हातील मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. तसेच नदी-नाले ओसंडून वाहत असल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश्यस्थिती निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे नाशिकमधील गंगापूर धरण 60 टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातून विसर्ग सुरु करण्यात आला आहे. याशिवाय इगतपुरीच्या दारणा धरणातूनही विसर्ग सुरु करण्यात आला असून धुळ्यातील अक्कलपाडा प्रकल्पही तुडुंब भरलाय. पालखेड धरणातील पाणीपातळीही वाढवली आहे.
एवढेच नाही तर, मराठवाड्यात देखील पावसाचा कहर पहायला मिळत असून 8, 9 आणि 10 जुलैला झालेल्या पावसाने मराठवाड्यात मोठे नुकसान झाले आहे. यामुळे जायकवाडी धरणाची पाणीपातळी 35.21 टक्क्यांवर पोहचली आहे. राज्यात 141 मोठे प्रकल्प आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे पाणीटंचाई पासुन सुटका होणार आहे. याशिवाय राज्यातील अनेक जिल्ह्यांना पुढील 3 दिवस रेड अलर्ट तर काहींना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कुठल्या जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट
12 जुलै
रेड अलर्ट – पालघर, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, नाशिक, गडचिरोली
ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, सिंधुदुर्ग, सातारा, औरंगाबाद, जालना, चंद्रपूर
13 जुलै
रेड अलर्ट – पालघर, रायगड, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, अकोला, अमरावती, नागपूर
14 जुलै
रेड अलर्ट – पालघर, नाशिक, पुणे
ऑरेंज अलर्ट – मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा
15 जुलै
ऑरेंज अलर्ट – पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक