सांगली जिल्हातील येडेनिपाणी येथील दत्तात्रय बाळू कोकरे (वय ३२) तरुणाचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना प्रकाश साळुखे यांच्या शेतात सोमवारी दुपारी घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कोकरे हा दुपारी प्रकाश साळुखे यांच्या शेतातील बांधावरील तण काढत होता. यावेळी बांधावर असलेल्या विजेच्या खांबाच्या आर्थीगच्या तारेला त्याचा हात लागला. पावसामुळे या तारेत वीज उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहीती मिळताच कुळप पोलीस ठाण्याचे घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय कोकरे याच्या पश्चात पत्नी, पुलगा व मुलगी असा परिवार आहे.