मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची (Panchganga river) पातळी 32.07 फुटांवर पोहचली आहे. गगनबावडय़ासह (Gaganbawada) पश्चिमेकडील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur distric) मागील काही दिवसांपासून पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली.
राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने जोरदार बॅटिंग सुरु केली आहे, (The state has been battered by heavy rains for the past few days) त्यामुळं राज्यातील अनेक भागात मुबलक प्रमाणात पाण्याचा साठा (Water Stock) झाला आहे, तसेच अनेक धरणांचे दरवाजे (Dam door) उघडण्यात आले आहेत. आता तर मागील काही दिवस पडलेल्या दमदार पावसामुळं कोल्हापूर तसेच नाशिक जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर आलेला आहे, (Many rivers in Kolhapur and Nashik districts were flooded) त्यामुळं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे.
कोल्हापुरात अनेक नद्यांना पूर
मुसळधार पावसामुळं पंचगंगा नदीची (Panchganga river) पातळी 32.07 फुटांवर पोहचली आहे. गगनबावडय़ासह (Gaganbawada) पश्चिमेकडील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस कोसळत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur distric) मागील काही दिवसांपासून पावसाची पुन्हा संततधार सुरू झाली. धरणातून वीजनिर्मितीसाठी विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मंदिराच्या आवारात पाणी आल्याने रविवारी रात्री दक्षिण द्वार सोहळा संपन्न । झाला. दरम्यान, कृष्णेच्या पाणी पातळीत आणखीन वाढ झाल्यास बॅक वॉटरमुळे कुरुंदवाडदरम्यानचा शिरढोण पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. कृष्णा नदी क्षेत्रातही सतत पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत दोन फुटांनी वाढ होऊन 29 फूट तीन इंच पाणी पातळी झाली आहे.
दरम्यान, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भाला सोसाटय़ाच्या वा-यासह झालेल्या मुसळधार पावसाने थोडपून काढले. नाशिक आणि कोल्हापुरात सर्व नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. रस्ते आणि पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यात 21 जुलैपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज आहे. नद्यांकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. असं हवामान खात्याने म्हटलं आहे.